संतप्त जमावाने पाठलाग करून पेटविला आयशर

Foto
दुचाकीस्वारास चिरडले
भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने दुचाकीला उडविणार्‍या आयशरला औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील दाभरुळ फाटा  येथे आडवुन आयशर पेटवुन दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आयशरला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना  यश आले नाही. यानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
रामनाथ सांडु बमनावत (वय 38 वर्षे, रा. निहालसिंग वाडी ता. अंबड) हे दुचाकी क्रमांक (एमएच 20 एसी 074) ने दैनंदिन कामे आटोपुन दाभरुळ फाट्याकडुन गावी निहालसिंग वाडी येथे जात होते.नेमके त्यावेळी अंबडकडून भरधाव वेगाने येणार्‍या आयशर क्रमांक (एमएच 20 सीटी 2198) हा कपाशीची वाहतूक करणारया आयशरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार रामसिंग बमनावत हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच जमावाने आयशरचा पाठलाग करुन आयशरला दाभरुळ फाटा येथे आडवुन पेटवून दिले. आयशर मध्ये कपाशीच्या गाठी असल्याने आयशरने मोठा पेट घेतला.घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे गोरखनाथ कनसे, नुसरत शेख, जीवन गुढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेट घेतलेल्या आयशरची आग विझविण्याचा पर्यंत केला मात्र आग विझविण्यात यश येत नव्हते. त्यामुळे त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण करुन आग आटोक्यात आणली. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker